आमची जुनी बाई 20 वर्ष काम करत होती. म्हंटलं तर 20 वर्ष जास्त वाटतात. पण मुलांना वाढवण्यात शाळेची दहा वर्ष कशी जातात हे कळत नाही. दिवस कसे अगदी कापरासारखे उडून जातात. आमच्या बाईचं नाव ‘गंगाबाई धोपट’. माझ्या मुलीच्या वेळी सातवा महिना लागला आणि मी घरी कामाला बाई ठेवावी असा विचार केला. तोपर्यंत मीच करत असे सगळं काम. चार लोकांना स्थळाबद्दल सांगून ठेवावं तसं मी चार लोकांना बाई हवीय म्हणून बोलून ठेवलं होतं. बर्या चदा आमच्या लायब्ररीतला एक चालता बोलता माहिती तंत्रज्ञानाचा कोश असलेला आमचा शिपाई प्रभाकर याने त्याच्या ‘गुगल’ वरुन माहिती काढली. आणि मला म्हणाला ‘’मॅडम! दुपारी घरी हाव ना? मी बाईला घिऊन येतो.’’ बोलल्याप्रमाणे तो एका मोठ्या मोठ्या फुलांची चापून चोपून नऊवारी साडी नेसलेल्या बाईला घेऊन आला. पहिलंच वाक्य...’’जल्ला..हिते र्हातावं काय तुमी? मी याच बिल्डींगीमधे काम करतो.’’ मग तिनं घर बघितलं. माझ्या सातव्या महिन्याच्या पोटाकडे बघत बघत तिने विचारलं घरी कोन कोन? सासू नाय का? कामाला जाता का? सायेबांना कामाला कुठे जायला लागतं? अशा तिच्या चौकशींना सामोरं जात पैशाची बोलणी झाली. कोणतीही घासाघिस न करता बाई पटली. ;) ‘’उद्यापासून येतो’’ असं म्हणत दुसर्या दिवशी बरोब्बर 9.30 वाजता आली. छान स्वच्छ काम करुन गेली. फारशी ओळख नसल्याने जास्त बोलली नाही. मी तर खुशच झाले. एखाद्याला खाखई सुटावी ना तसं तिला कामाबद्दल होतं. कपडे धुवायला कमी असले तर शोधून शोधून कपडे धुवायला घ्यायची. जरा जास्त ओळख झाल्यावर मला म्हणायची ‘’आता यावेली पोरगाच हून्दे. भैणीला भाव हवा’’ मी तिला म्हणायचे ‘’अहो बाई आपलं पोर, मग ते कोणीही असू दे. हाती पायी धड असलं म्हणजे काही नको. मुलगाच हवा असं का?’’ पण ‘’वंशाला दिवा हवा’’ या चौकटीच्या विचारात घट्ट बांधलेली असल्याने ‘’याखेपेस मुलगाच व्हनार’’ असं म्हणायची.
यथावकाश मी माझ्या मुलीला घरी घेऊन आले. ही कामच करत होती. पण काम झालं तरी तिने बाळाला लांबूनच बघितलं. आणि बाळाच्या आजीला म्हणाली ‘’पोर गोरी हाय हो आजी.’’ मला कळेना की ही जवळ का येत नाही बाळाच्या? मनात म्हंटलं, असेल घाईत. मग दुसऱ्याच दिवशी येऊन हात पाय धूऊन बाळाशी गप्पा मारायला लागली. ‘’सोनी..वो सोनी. आलीस काय तू? आईला तरास जाला ना? आता जागायचं नाय. गपचिप झोपायचं’’ हा संवाद आम्ही सगळेच ऐकत आणि बघत होतो. मला म्हणाली ‘’ काल चौथा दिवस. भ्हायेरची होते. मंग शिवाशिव नको. म्हणून लांबून बगितलं.
अत्यंत विश्वासू. खिशात वेलदोडा सापडला तरी परत करणारी. एकदा याच्या खिशात वेलदोडा सापडला. तर ‘’तेंच्या खिशात येलची गावली. मी पानाबरोबर खल्ली’’ अशी कबुली दिली. अशा काही काही प्रसंगानंतर ती आमच्या घरातलीच एक झाली.
तिला एकूण चार मुलं. तीन मुलगे आणि एक मुलगी. अक्षरओळखही नसलेली ही बाई अत्यंत व्यवहार चतुर आहे. एकाचवेळी मुलीला आणि दोन्ही मुलांना मुलं होणार म्हणून जरा विचारात पडली होती. मुलांना वाटे की आईने आपल्याकडे मुल सांभाळायला यावं. या कात्रीत सापडून तिला काही दिवस सुचत नव्हतं. मग एका फटक्यात तिनं ठरवलं की आता सहा महिने आपण बदली बाई देऊ. सध्या तिच्या घरात एकाच वेळी 3 नातवंडं झाल्याने तिलाच बाळंतपणाची सुट्टी घ्यायला लागली आहे. म्हणून बदलीची बाई मी मनात नसताना झेपवतीये.

No comments:
Post a Comment